मुंबई : राज्यात कोरोनाच्या संकाटावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच एका सर्वेक्षणानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इतर मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत अव्वल ठरले आहेत.
प्रश्नम या संस्थेने महाराष्ट्र, बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या 13 राज्यांतील जनतेचा कौल जाणून घेतला होता.
जवळपास 17,500 मतदारांनी सहभाग नोंदवलेल्या या सर्वेक्षणात सर्वाधिक मतदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पसंती दर्शवली आहे. त्यामुळे जनतेनं दिलेल्या काैलनुसार उद्धव ठाकरे यांना पहिल्या क्रमांकाची पसंती मिळाली आहे. कोरोनाच्या कालावधीत केेलेल्या कामगिरीवरून जनतेनं हा काैल दिला आहे.
49 टक्के लोकांनी उद्धव ठाकरे यांची कामगिरी चांगलं असल्याची मत नोंदविली. तर त्यापाठोपाठ दुसऱ्या स्थानी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान असून त्यांना 44 टक्के मतं मिळाली आहे. तर तिसऱ्या स्थानी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची वर्णी लागली. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना या यादीत 5 नंबरचं स्थान मिळालं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
मायबाप सरकारला मला विचारायचं आहे की…; पुण्यातील घटनेवरुन चित्रा वाघ संतापल्या
“देवेंद्र फडणवीस राजकारणातील सर्वात लबाड माणुस”
“….पण जनता तुम्हाला ‘पळ’ काढायला लावल्याशिवाय शांत बसणार नाही”
पंकजा मुंडे कधीच बंडाचा विचार करणार नाही- चंद्रकांत पाटील