मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर त्यावरून बरंच राजकारण पेटलेलं दिसून येत आहे. पण हे राजकारण सत्ताधारी विरुद्ध विरोधक असं नसून सत्ताधाऱ्यांमध्येच या मुद्द्यावरून कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय.
सत्तेच्या खुर्चीभोवती पिंगा घालणारे महाविकास आघाडीतील सत्ताधारी पक्ष स्वबळाची भाषा करतायत,परंतु जनता त्यांना ‘पळ’ काढायला लावल्याशिवाय शांत बसणार नाही, असं म्हणत प्रवीण दरेकारांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
शेतकऱ्याचा माल विकला जात नाही. पीकविमा मिळाला नाही. शेतकरी हतबल झालाय. त्याच्या हातात बळ नाही. बेरोजगार युवक कामाच्या प्रतीक्षेत आहे. तुमच्या स्वबळाचं राज्यातल्या कामगारांना, जनतेला देणं-घेणं नाही. आमच्या हातात बळ कधी येणार? आमचं कुटुंब, आमचा संसार कधी बळकट होणार? याकडे महाराष्ट्राची जनता बघत आहे. पण यांना त्याचं काही पडलेलं नाही”, असं प्रवीण दरेकर म्हणाले.
सत्तेच्या खुर्चीभोवती पिंगा घालणारे महाविकास आघाडीतील सत्ताधारी पक्ष स्वबळाची भाषा करतायत,परंतु जनता त्यांना ‘पळ’ काढायला लावल्याशिवाय शांत बसणार नाही! pic.twitter.com/D6SACuVtFP
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) July 14, 2021
महत्वाच्या घडामोडी –
पंकजा मुंडे कधीच बंडाचा विचार करणार नाही- चंद्रकांत पाटील
थोरात साहेब, तुम्ही आम्हांला जेवायला बोलवा, आम्ही स्वबळावर जेवायला येऊ; मुख्यमंत्र्यांचा चिमटा
…म्हणून नाना पटोले यांचे फोन चोरून ऐकण्यात आले- संजय राऊत
चंद्रकांत पाटील म्हणजे निरागसतेचं लेणं, एक निष्पाप बालक”