नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची दोनदा भेट घेतल्यानंतर निवडणूक स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर यांनी आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी प्रशांत किशोर यांना आपले प्रधान सल्लागार म्हणून नियुक्त केलं होतं. त्यानंतर आज प्रशांत किशोर राहुल गांधी आणि प्रियंका यांना भेटले. यावेळी पंजाबचे प्रभारी हरीश रावतही उपस्थित होते.
दरम्यान, पंजाबच्या निवडणुकीबाबत रणनीती ठरविण्यावर या बैठकीत चर्चा झाल्याचं म्हटलं जात आहे. यावेळी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, केसी वेणुगोपाल आणि पंजाबचे काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत हेही या बैठकीत उपस्थित होते.
महत्वाच्या घडामोडी –
माझा नेता नरेंद्र मोदी आणि अमित शहा; पंकजा मुंडेंचा फडणवीसांवर निशाणा?
नाना पटोलेंची अवस्था रोज मरे, त्याला कोण रडे अशी झालीये- प्रवीण दरेकर
मी मंत्री झालो, मुंडे साहेब माझे नेते होते आणि आज पंकजाताई आहेत- डाॅ.भागवत कराड
मी सर्व कार्यकर्त्यांचे राजीनामे नामंजूर करत आहे; पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य