“…अन् त्याने प्रियसीचे जुने फोटो व्हॉट्सअपला ठेवून केली बदनामी”

0
235

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे :  तीन वर्षांच्या प्रेमानंतर ब्रेकप झाले. पण, प्रियकर प्रियसीचा पिच्छा सोडत नव्हता. त्याने प्रियसीचा पाठलाग तर केलाच पण, दुसऱ्याशी लग्न होऊ नये यासाठी त्याने जुने फोटो व्हॉट्सअपला ठेवून बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मयुर प्रविण शहा (वय २९, रा. मसुर. ता. कराड, जि. सातारा) याच्यावर पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 26 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे.

हे ही वाचा : म्हाडा पेपरफुटी प्रकरणावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूणी व मयुर हे लांबचे नातेवाईक आहेत. त्यांच्यात 2014 ते 2017 या तीन वर्षात प्रेमसंबंध होते. प्रेमसंबंध सुरळीत असताना त्यांनी एकमेंकासोबत फोटो देखील काढले होते. परंतु, काही वर्षांपुर्वी त्यांच्यात दुरावा निर्माण झाला व त्यांच्यातील वाद टोकाला गेले. त्यांच्यात प्रेमप्रकरण संपुष्टात आले.

दरम्यान, त्यानंतर देखील मयुर हा वारंवार तरूणीच्या मोबाईलवर फोन व मेसेज करत होता. तसेच, त्यांचा पाठलाग करत होता. त्यावरही न थांबता त्याने बदनामी व्हावी तसेच दुसऱ्या कोणाशीही विवाह होऊ नये यासाठी प्रेमसंबंध असतानाच्या काळात काढलेले जुने फोटो त्याच्या व्हाट्सअप स्टेटसला ठेवले व बदनामी केली.

महत्वाच्या घडामोडी –

तुम्ही हिंदू आहात तर…; चंद्रकांत पाटलांचं राहुल गांधींना आव्हान

“तृणमूल काँग्रेसचा राष्ट्रवादीला मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता करणार तृणमूलमध्ये प्रवेश”

 ममता बॅनर्जी असो की राहुल गांधी सर्वांना केवळ शरद पवारच एकत्र आणू शकतात- संजय राऊत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here