Home जळगाव लेकीनंही बापाने केलेल्या कामाची जाण ठेवली पाहिजे; गुलाबराव पाटलांचं रक्षा खडसेंना प्रत्युत्तर

लेकीनंही बापाने केलेल्या कामाची जाण ठेवली पाहिजे; गुलाबराव पाटलांचं रक्षा खडसेंना प्रत्युत्तर

जळगाव : केळी पीक योजनेच्या नुकसान भरपाईचे निकष बदल करण्याचे श्रेय मी घेत नाही. मात्र मंत्री गुलाबराव पाटील हे मला वडिलांसारखे आहेत. त्यामुळे याप्रकरणी त्यांनी माझ्यावर टीका न करता मुलीने चांगलं काम केलं म्हणून प्रोत्साहन द्यायला हवं, असं वक्तव्य भाजप खासदार रक्षा खडसे यांनी केलं होतं. यावर गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

लेकीनेही बापाने केलेल्या कामाची जाण ठेवली पाहिजे. लेक आहे तर लेक आहेच. लेकीने बापाच्या कामाचा विचार करावा आणि लेकीने बापाच्या हद्दीत राहावं, असं जोरदार प्रत्युत्तर गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिलं.

दरम्यान, हवामानावर आधारित फळपीक विम्याचे निकष राज्य शासनाने बदलले. पण रक्षा खडसे या केंद्राने निकष बदलल्याचा खोटा दावा करीत आहेत. कुठे लग्न दिसले की आपला बाजा घेऊन त्या ठिकाणी वाजविण्यास त्या हजर होतात, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली होती. त्यानंतर रक्षा खडसे यांनी गुलाबराव पाटलांना टोला लगावला होता.

महत्वाच्या घडामोडी –

भाजपचे नेतेच ओबीसी आरक्षणाचे मारेकरी, भाजपचं हे ढोंगी राजकारण- अमोल मिटकरी

देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्राला गरज, त्यांचं भविष्य उज्वल, मी स्वत: भेटेन- संजय राऊत

“…तर आपण खऱ्या अर्थाने गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवत आहात हे सिद्ध होईल”

“ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न निर्माण होणे हे भाजपाचे पाप