Home महाराष्ट्र ठाकरे सरकारलाच कोरोनाची लागण, सरकार गेल्याशिवाय हा कोरोना बरा होणार नाही- सदाभाऊ...

ठाकरे सरकारलाच कोरोनाची लागण, सरकार गेल्याशिवाय हा कोरोना बरा होणार नाही- सदाभाऊ खोत

अहमदनगर : ठाकरे सरकारलाच कोरोनाची लागण झाली आहे. आणि हे सरकार गेल्याशिवाय हा कोरोना बरा होणार नाही, असं म्हणत रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय. सदाभाऊ खोत यांनी ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांची भेट घेतली व तब्बेतीची विचारपुस केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

राज्याचे मुख्यमंत्री घरात बसून राज्याच्या कारभार हाकत आहे. प्रत्यक्षात काय सुरु आहे हे त्यांना दिसत नाही. युती सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन 50 हजार रुपये नुकसान भरपाई देऊ असं म्हणाले होते. मात्र, उद्धव ठाकरे आता घरातून बाहेर पडायला तयार नाहीत. हे सरकार कोरोनाचं भूत घेऊन सर्वत्र हिंडत आहे. मोर्चे, आंदोलनावर बंदी घातली जात आहे. खरं तर ठाकरे सरकारलाच कोरोना झालाय, असं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.

दरमयान, मराठा सरकारकडे पाहिलं तर आपला पक्ष, आपला आर्थिक संच कसा आणि कोणत्या मार्गाने वाढवता येईल याची स्पर्धा लागलेली पाहायला मिळतेय. विकासासाठी मात्र हे सरकार काही करत नाही. राज्यात ऐन पेरणीच्या काळात शेतकऱ्यांना पीककर्ज, खत, बी बियाणे मिळत नाही. मराठा समाजाला न्याय देण्याची नियतही या सरकारची नाही, असंही सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

प्रताप सरनाईक यांचं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रं; म्हणाले…

“बाळासाहेब ठाकरेंसाठी वाईट वाटतं, शिवसेनेची सुरूवात केली वाघांना घेऊन…संपणार कुत्र्यांमुळे”

“स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेसने आधी गोंधळातून बाहेर यावं आणि मग निर्णय घ्यावा”

…याला म्हणतात शिवसैनिक; दादरमधील राड्यावरुन उद्धव ठाकरेंचा निशाणा