मुंबई : राम मंदिराच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवसेना विरुद्ध भाजप असं चित्र सध्या मुंबईत पाहायला मिळत आहे.
मुंबई भाजप युवा मोर्चाने शिवसेनेविरोधात थेट शिवसेना भवनावर मोर्चा काढण्याचा निर्धार केला होता. मात्र, शिवसेना भवनापासून काही अंतरावरच पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना अडवलं आणि त्याब्यात घेऊन त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यात आलं. तसेच दुसरीकडे शिवसैनिकांनी भाजपच्या काही महिला पदाधिकाऱ्यांनां काठीने मारहाण केल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला.
दरम्यान, राम मंदिर बांधण्यासाठी भूसंपादनाबाबत खोटे आणि बनावट आरोप केल्याचा दावा करत भाजपने फटकार मोर्चा आयोजित केला आहे. भाजप युवा मोर्चा मुंबईचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मात्र शिवसेना भवनापासून 5 किमी अंतरावरच पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना अडवलं आणि त्यांना ताब्यात घेतलं.
महत्वाच्या घडामोडी –
मराठा आरक्षणासाठी लोकसभेचं अधिवेशन झालंच पाहिजे- खासदार धैर्यशील माने
अजित पवारांनी अधिकाऱ्यांच्या करिअरवर नांगर फिरवण्याचं काम केलंय- गोपीचंद पडळकर
“ठाकरे सरकारमधील तीन पक्षांचे तीन मुख्यमंत्री व्हायले हवेत, कारण 2024 नंतर भाजपची सत्ता असणार”