कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून खासदार संभाजीराजे छत्रपती हे आक्रमक झाले आहेत. संभाजीराजेंच्या नेतृत्वात महाराष्ट्रात मराठा मूक मोर्चा निघणार आहे. या मोर्चाला आता वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दर्शवला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे उद्या आंदोलनासाठी कोल्हापुरात दाखल होऊन मराठा आरक्षणाला पाठिंबा देतील. वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृ्त ट्विटर हँडलवरून ट्विट करत याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
उद्या दि. १६ जून रोजी कोल्हापुरात मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी खा. संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली आयोजित मराठा आरक्षण मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत., असं वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृ्त ट्विटर हँडलवरून ट्विट करण्यात आलं आहे.
उद्या दि. १६ जून रोजी कोल्हापुरात मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी खा. संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली आयोजित मराठा आरक्षण मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत.@Prksh_Ambedkar @YuvrajSambhaji
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) June 15, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“टाक खंडणी बोलून पैसे जमा करणाऱ्या शिवसेनेनं राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावं”
“आंदोलन करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आवाहन संभाजीराजेंना केलं होतं, पण…”
“काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल”
“राम मंदिर ही भाजपची खासगी मालमत्ता नाही, आम्हीही राममंदिरासाठी विटा दिल्या आहेत”