मुंबई : चंचल राजकारणात कधीही काहीही घडू शकतं. कोणीही कोणासोबत जाऊ शकतं, असं भाष्य शिवेसेना खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. यावरुन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी संजय राऊतांवर निशाणा साधलाय.
राजकारण हे कधीच चंचल नसतं, राजकीय नेते हे चंचल असतात. शिवसेनेची विचारधाराही अशीच चंचल झाली आहे, अशी टीका प्रवीण दरेकरांनी केली आहेत ते रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत बोलतात त्याप्रमाणे राजकारणात घडत नाही. राजकारण कधीच चंचल नसते, राजकीय नेते हे चंचल असतात. पण आपली वैचारिक भूमिका आणि विचारधारा ही चंचल नसावी. शिवसेनेच्याबाबतीत ही गोष्ट घडत आहे. संजय राऊत यांनी त्याचा विचार करावा, असं प्रविण दरेकर म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
ह्यांचं फक्त एकच काम, याला फोडा त्याला जोडा; अशोक चव्हाणांची भाजपवर जोरदार टीका
प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी…; रामदास आठवलेंचा कविता स्टाईलमध्ये शरद पवारांना टोला
खाल्लेल्या ताटात थुंकणे हीच शिवसेनेची सवय; निलेश राणेंचा हल्लाबोल
खेड तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही- खासदार अमोल कोल्हे