धक्कादायक! मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेल्या स्कॉर्पिओ मालकाचा संशयास्पद मृत्यू

0
173

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकानंतर आता नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कारण जी स्कॉर्पिओ कार अंबानींच्या घराबाहेर सापडली होती, त्या गाडीमालकाचा मृतदेह सापडला आहे. मनसुख हिरेन असं मृत व्यक्तीचं नाव असून त्याचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर भागात सापडला आहे. गाडीचा शोध लागल्यानंतर मनसुख हिरेन हे मुंबई पोलीसांसमोर हजरही झाले होते. गाडी चोरीला गेल्याचं त्यावेळेस त्यांनी पत्रकारांना सांगितलं होतं.

दरम्यान, मनसुख हिरेन काल रात्रीपासूनच बेपत्ता असल्याची माहिती होती. मात्र आज हिरेन यांचा मृतदेह आढळून आल्यानं या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“धनंजय मुंडेंच्या कारभाराने बीड जिल्ह्याची मान खाली”

कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी…; अमृता फडणवीसांचं नवीन गाणं रिलीज

…नाहीतर एकाही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही- गोपीचंद पडळकर

…हा प्रकार जबाबदार विरोधी पक्षाचे लक्षण नाही, हा उठावडेपणा; एकनाथ खडसेंचा हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here