…त्यामुळे मीही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहात आहे- जयंत पाटील

0
390

सांगली : राजकीय जीवनात सर्वोच्च पद प्राप्त करणं ही मनीषा प्रत्येकाचीच असते. त्यामुळे मीही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहात आहे, असी गौप्यस्फोट जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. ते इस्लामपूरमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते.

गेली 20 वर्ष राजकारणात सक्रीय सहभाग असल्याने मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहणे हे नक्कीच ‘दिवास्वप्न’ नाही तर राजकारणातील शक्तीने हे स्वप्न हस्तगत करणं हे आपलं उद्दिष्ट आहे, असं  जयंत पाटील म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न साकार करण्यासाठी पक्ष बांधणी आणि आमदारांचं संख्याबळ वाढवणे यासाठी अथक प्रयत्न करावे लागतील, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी राजीनामा द्यावा; चंद्रकांत पाटलांची मागणी

“धनंजय मुंडे दोषी आढळले तर कारवाई करण्याची जबाबदारी आमची”

ऐतिहासिक! जो बायडन बनले अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष

“आम्ही चंद्रकांत पाटलांना कोल्हापूरमधून निवडून आणू”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here