Home महाराष्ट्र पेट्रोलने शंभरी गाठली! दाढीवाला फलंदाज आणि मॅन ऑफ दि मॅच; ठाण्यात राष्ट्रवादीची...

पेट्रोलने शंभरी गाठली! दाढीवाला फलंदाज आणि मॅन ऑफ दि मॅच; ठाण्यात राष्ट्रवादीची होर्डिंगबाजी

ठाणे : भाजपच्या सत्ता काळात मे महिन्यात सुमारे 14 वेळा इंधनाचे दर वाढले आहेत. आता तर पेट्रोलने शंभरी गाठली आहे. त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने संपूर्ण ठाणे शहरात अनोखे होर्डिंग्ज लावले आहेत.

राष्ट्रवादीने मोदी सरकार ‘मॅन ऑफ दी मॅच’, ‘अच्छे दिनाच्या शुभेच्छा’, असा मजकूर असलेली होर्डिंग्ज ठाण्यामध्ये लावली आहेत. राष्ट्रवादीच्या या होर्डिंगबाजीची ठाण्यामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.

ठाण्यात आज पेट्रोलचा भाव 100.40 रुपये तर डिझेल 91.87 रुपये प्रति लिटर आहे. त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने हे फलक लावले आहेत. या होर्डिंग्जवर दाढीवाल्या फलंदाजाचे चित्र असून त्याने शतक पूर्ण केल्याचे नमूद केले आहे. मॅन ऑफ दी मॅच; पेट्रोल 100 नॉट आऊट; अच्छे दिनाच्या शुभेच्छा, असा मजकूर या होर्डिंग्जवरवर लिहिण्यात आला आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालची निवडणुक संपल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत या महिन्यातील 4 तारखेनंतर आज चाैदा वेळेला ही दरवाढ करण्यात आली.

महत्वाच्या घडामोडी –

पंतप्रधान मोदींमध्ये अधिवेशन घेण्याची हिम्मत आहे की नाही?- जयंत पाटील

राज्यात 15 दिवस लाॅकडाऊन वाढणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे

भगिनींनो संसार वाचवायला कंबर खोचून उभ्या राहा, या सरकारने…; दारुबंदीवरून चित्रा वाघ कडाडल्या

सरकारला दारू विक्रेत्यांकडून मिळणाऱ्या मेव्याचा हेवा; चंद्रपूरमधील दारुबंदी उठवल्यानंतर पडळकरांची टीका