Home महाराष्ट्र लॉकडाउन पुन्हा करावा लागेल का?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात…

लॉकडाउन पुन्हा करावा लागेल का?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात…

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला.

माझे कुटुंबं माझी जबाबदारी ही जशी मोहीम आपण राबवली, तेव्हा आपण सर्वजण घरामध्ये होता. घरा-घरांमध्ये आपले आरोग्य व अन्य सर्व यंत्रणेचे कर्मचारी येऊन आपली विचारपूस करत होते. पण आता ही मोहीम पुन्हा करायची झाली, तर अवघड आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, तेव्हा तुम्ही घरांमध्ये होता आता सगळे घराबाहेर आहात. मग या यंत्रणेवर किती ताण टाकायचा. मी म्हटलं की आता लॉकडाउन करावा लागेल का? तर काही जण म्हणतात तुम्ही तपासण्या वाढवा. तपासण्या देखील वाढवल्या आहेत. पण एका यंत्रणेवर आपण ताण टाकायचा आणि आपण बेभानपणाने वागायचं हा त्या यंत्रणेशी केलेला अमानुषपणा आहे, असं मी म्हणेल, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

…तर राहुल गांधींना आधी लग्न करावं लागेल- रामदास आठवले

संभाजी भिड़े गुरूजी यांचे कान भरवल्यामुळे आपलं निलंबन झालं- नितिन चौगुले

अहो आधी तुमची मानसिकता बदलायला हवी, मग…- अतुल भातखळकर

…अन्यथा कोरोना पुन्हा येईल; भगतसिंह कोश्यारी यांचा इशारा