Home महाराष्ट्र “अकोल्यात 23 फेब्रुवारी पासून 1 मार्चपर्यंत लॉकडाऊन”

“अकोल्यात 23 फेब्रुवारी पासून 1 मार्चपर्यंत लॉकडाऊन”

अकोला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातल्या काही भागात 23 फेब्रुवारी ते 1 मार्च असा आठवडाभराचा लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे.

संपूर्ण अकोला जिल्ह्यात लॉकडाऊन घोषीत करण्यात आलेला नाही तर अकोला शहर, मुर्तीजापूर शहर आणि अकोट शहर अशा तीन ठिकाणी हा लॉकडाऊन असेल. सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत जीवनाश्यक वस्तुंची दुकानं सुरु रहातील. इतर सगळी दुकानं बंद रहातील.

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी हे आदेश काढले आहेत. 23 तारखेपासून लॉकडाऊन असल्यामुळे जनतेकडं आणखी दोन दिवस असतील. त्या काळात त्यांना हवं त्या गोष्टींची तयारी करु शकतात. मुख्यमंत्र्यांनीच अचानक लॉकडाऊन न करण्याची घोषणा केली आहे. त्यापार्श्वभूमीवरच लॉकडाऊनच्या आधी दोन दिवस दिले गेलेत.

महत्वाच्या घडामोडी –

लॉकडाउन पुन्हा करावा लागेल का?; मुख्यमंत्री उद्धव ठकारे म्हणतात…

…तर राहुल गांधींना आधी लग्न करावं लागेल- रामदास आठवले

संभाजी भिड़े गुरूजी यांचे कान भरवल्यामुळे आपलं निलंबन झालं- नितिन चौगुले

अहो आधी तुमची मानसिकता बदलायला हवी, मग…- अतुल भातखळकर