मुंबई : महाविकासआघाडी सरकारमध्ये शिवसेना नाराज आहे, ही निव्वळ अफवा आहे. अशा अफवांवर विश्वास ठेवण्याची गरज नाही, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे बऱ्याच दिवसांपासून आजारी असल्यामुळे घरी होते. त्यामुळे ते बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले. यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असं संजय राऊतांनी यावेळी स्पष्ट केलं. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात चर्चेसाठी इतर अनेक विषय आहेत. प्रत्येकवेळी राजकारणावरच चर्चा झाली पाहिजे का, असा प्रश्न संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच शरद पवार यांचा या सरकारला पूर्णपणे आशीर्वाद असून हे सरकार 5 वर्षे चालेल, असा विश्वास संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.
महत्वाच्या घडामोडी –
मी भाजपा ची पोलखोल करणार; सचिन सावंतांचा इशारा
मालकाच्या कर्तृत्वाचं असं जाहीर पोतेरं करू नये; अतुल भातखळकरांचा संजय राऊतांना टोला
“शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा निवासस्थानी भेट”
“मुक्ताईनगरमध्ये भाजपला मोठा धक्का! भाजपच्या 10 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश”