राजीनामा देऊन काय मेहेरबानी केली नाही, आता तातडीने गुन्हा दाखल व्हावा; निलेश राणेंचा हल्लाबोल

0
354

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया देत संजय राठोड यांच्यावर निशाणा साधला आहे.

राजीनामा देऊन काय मेहेरबानी केली नाही. त्यांना राजीनामा द्यायलाच लागणार होता. पण आता इथून पुढे चौकशी कशी होणार? याकडे विरोधी पक्षाचं विशेष लक्ष आहे. संजय राठोड यांच्यावर गुन्हाही दाखल व्हावा, अशी मागणीही निलेश राणे यांनी केली. तसेच वनमंत्र्यांनी राजीनामा दिला मात्र तो राजीनामा उद्धव ठाकरे स्वीकारणार का, हे ही पाहावं लागेल, असा टोलाही निलेश राणेंनी यावेळी लगावला.

दरम्यान, विरोधी पक्षाने एक दबाव निर्माण केला, त्यातून हा राजीनामा दिला गेला आहे. हत्या की आत्महत्या याची चौकशी केली पाहिजे. ठाकरे सरकारने आतापर्यंत सगळ्यांना वाचवण्याचं काम केलंय. परंतु आता नेत्यांना वाचवण्याचं काम थांबवायला हवं. नेत्यांच्या कृत्यांची शिक्षा त्यांना व्हायलाच हवी, असंही निलेश राणे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी 

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण! वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

…पण जयंतरावांच्या बाॅसला हे अजूनही जमत नाही; राम कदमांचा शरद पवारांना अप्रत्यक्ष टोला

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मोठा निर्णय घेणार- अजित पवार

…त्यामुळे शरद पवारांची जीभ घसरली असेल- राम शिंदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here