Home महाराष्ट्र उद्धव ठाकरेंचा कोकण दाैरा म्हणजे लिपस्टीक दाैरा; नितेश राणेंचा घणाघात

उद्धव ठाकरेंचा कोकण दाैरा म्हणजे लिपस्टीक दाैरा; नितेश राणेंचा घणाघात

मुंबई : तौक्ते चक्रीवादळाचा फटका मुंबई, कोकण आणि गुजरात किनारपट्टीला बसला. महाराष्ट्रात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या कोकण दाैऱ्यावर जाणार आहेत. यावर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रमुतिक्रिया देत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे यांचा तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवरचा कोकण दौरा म्हणजे केवळ दिखाऊपणा आहे. लिपस्टिक लावल्यावर सगळं कसं छान सुंदर आहे हे दाखवलं जातं आणि तोंड धुतल्यावर सगळं निघून जाते, तसा हा प्रकार असल्याचा घणाघात नितेश राणेंनी यावेळी केला. तसंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा दौरा हा कोकणातील वस्तुस्थिती सरकारपुढे मांडण्यासाठी होता. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याने काहीही साध्य होणार नाही, असंही नितेश राणे म्हणाले.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन सर्व कारभार देवेंद्र फडणवीस यांच्या हातात द्यावा. मग आम्ही किती मदत आणून दाखवतो, ते बघा. एवढी हिंमत तुमच्यात आहे का? असा हल्लाबोलही नितेश राणेंनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

“कोकणाने शिवसेनेला आत्तापर्यंत खूप काही दिलं, आता शिवसेनेने कोकणाला देताना हात आखडता घेऊ नये”

“महाराष्ट्राच्या जनतेला उद्धव ठाकरे व नरेंद्र मोदी दोघांमध्येही भविष्य दिसत नाही”

मराठा आरक्षणासंदर्भात पंतप्रधान मोदींना 4 वेळा पत्र दिलं, अद्याप भेट नाही- खासदार संभाजीराजे

“देवेंद्र फडणवीसांनी राज्यभर फिरण्यासाठी ई-पास काढलाय का?”