मुंबई : कोकणाने शिवसेनेला आत्तापर्यंत खूप काही दिलं आहे, आता शिवसेनेने कोकणाला देताना हात आखडता घेऊ नये असं म्हणत वादळाचा फटका बसलेल्या सर्वांना तात्काळ मदत करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली
आंब्यांची झाडं, बागा किंवा इतर बागा यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. जवळपास 100 बोटींचं नुकसान झालेलं आहे. जवळपास 100 शाळांवरच्या छताचं नुकसान झालं आहे. अनेक आरोग्य केद्रांचंही नुकसान झालेलं आहे, अजूनही जिल्हाधिकाऱ्यांकडून पंचनामे करणं सुरु आहे. त्यानंतर खरं किती नुकसान झालं आहे ते कळेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तौते चक्रीवादळामुळे कोकणात झालेल्या नुकसानीची पाहणी करताना ते बोलत होते.
दरम्यान, आम्ही निसर्ग चक्रीवादळाविषयीही जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी निसर्ग चक्रीवादळासाठी सरकारने दिलेले 150 कोटी रुपये वाटल्याची माहिती दिली. रत्नागिरीसाऱख्या मोठ्या जिल्ह्याला जर केवळ 150 कोटी रुपये आले असतील तर या भरपाईच्या घोषणा पोकळ आहेत, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
“महाराष्ट्राच्या जनतेला उद्धव ठाकरे व नरेंद्र मोदी दोघांमध्येही भविष्य दिसत नाही”
मराठा आरक्षणासंदर्भात पंतप्रधान मोदींना 4 वेळा पत्र दिलं, अद्याप भेट नाही- खासदार संभाजीराजे
“देवेंद्र फडणवीसांनी राज्यभर फिरण्यासाठी ई-पास काढलाय का?”
पंतप्रधान साहेब, खतांच्या किंमती कमी करा; डाॅ.प्रीतम मुंडेचं पंतप्रधान मोदींना पत्र