Home महाराष्ट्र शरद पवारांच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र; म्हणाले..

शरद पवारांच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र; म्हणाले..

मुंबई : राज्यात सध्या करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लॉकडाउनचा कालावधी वाढण्यात आलेला आहे. यामुळे उद्योग जगतवार याचा मोठा परिणाम झाल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहलं आहे.

कोविड-19 ह्या जागतिक महामारीच्या दुसर्‍या लाटेने महाराष्ट्रात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. करोना संक्रमणाची साखळी तोडायची असल्याने पुनश्च संचारबंदीचा निर्णय राज्य शासनाला घ्यावा लागला. याचा परिणाम अनेक व्यवसाय-धंद्यांवर झाला असून हा वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

एफएल-3 परवानाधारक हॉटेल-परमीटबार मालकांना अबकारी कराचा भरणा किमान 4 हप्त्यांमध्ये करण्याची सवलत द्यावी. वीज बिलात सवलत मिळावी तसेच मालमत्ता करात सूट मिळावी आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आपतकालीन पतरेखा हमी योजना क्र. 1.0 व 2.0 अंलता आणून सदर योजनेला दिनांक 30 जून 2021 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. तसेच, पर्यटन-आदरातिथ्य व्यवसायांकरिता क्र. 3.0 योजना जाहीर केली आहे. महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यात देखील उद्योग – व्यवसायाला संजिवनी देणारी, रोजगाराला प्रोत्साहन देणारी योजना राबवावी.” असे शरद पवारांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे.

आदरातिथ्य क्षेत्रातील व्यावसायिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने त्यांच्या मागण्यांचा मा. मुख्यमंत्री सहानुभूतीपूर्वक विचार करतील, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाच्या या संकटातून जनतेला दिलासा मिळेल, हा विश्वास मला आहे, असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

अजितदादा धडाडीचे नेते, ते उपमुख्यमंत्री झाल्यावर का बदलले?

“पंतप्रधान मोदीसाहेब, बंगाल मधील पराभवाचा राग पेट्रोल डिझेलवर का काढताय?”

ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल आणि इंग्लंड विरूद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा

उद्धव ठाकरेंची महाविकास आघाडीत घुसमट; भाजप नेत्याच्या या वक्तव्यावर अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले…