मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. त्यामुळे मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. यावर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून विरोधकांवर निशाणा साधला आहे.
मराठा आरक्षण हा राजकारणाचा किंवा पेटवापेटवी करण्याचा विषय नाही, हे राज्यातील विरोधकांनीही नीट समजून घेतले पाहिजे. शाहबानो प्रकरण, अॅट्राॅसिटी कायदा, 370 कलम रद्द करणे याविषयी केंद्र सरकारने तत्पर निर्णय घेऊन जी न्यायप्रियता दाखवली, प्रसंगी घटनेत बदल केले तीच गती आता केंद्र सरकार मराठा आरक्षणाबाबतही दाखवेल, अशी अपेक्षा करण्यात गैर ते काय? असा प्रश्न सामना अग्रलेखातून उपस्थित केला आहे.
दरम्यान, छत्रपती खासदार संभाजीराजे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर जी समंजस भूमिका घेतली आहे, तीच भूमिका पुढे नेत विरोधी पक्ष आणि महाआघाडी सरकारमधील सर्व पक्षांनी एकजुटीने मराठा समाजाच्या हक्काची ही लढाई पुढे नेली पाहिजे, असा सल्लाही सामनातून यावेळी देण्यात आला.
महत्वाच्या घडामोडी –
“माजी केंद्रीय मंत्री अजित सिंह यांचं कोरोनामुळे निधन”
राज्य सरकारच्या चुकीमुळे मराठा समाजावर अन्याय झाला आहे- रामदास आठवले
महाराष्ट्र सरकारने आता तरी मराठा आरक्षण हा विषय गांभीर्याने घ्यावा- चित्रा वाघ
मराठा आरक्षणाच्या विषयावर महाविकास आघाडी सरकार हतबल- प्रवीण दरेकर