मुंबई : मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार पंतप्रधानांना असेल तर मराठा आरक्षणासाठी वर्षभरापासून पंतप्रधानांची वेळ मागणाऱ्या छत्रपती संभाजी राजेंना पंतप्रधानांनी वेळ का दिली नाही?’ असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलं. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मराठा आरक्षण हे सगळ्यांनाच हवं आहे. त्यामुळे विधानसभेत सर्व पक्षांनी एकमताने ठराव मंजूर केला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय दुर्दैवी आहे. त्यामुळे आता केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र आले पाहिजे. आम्ही पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडे जायला तयार आहोत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही आमच्यासोबत यावे. त्यांनी शिष्टमंडळाचं नेतृत्व करावं, असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्यायचा अधिकार पंतप्रधानांकडे आहे, असं सर्वोच्च न्यायालय म्हणतंय. मग मराठा लढ्याचं नेतृत्व करणाऱ्या छत्रपती संभाजीराजे यांना गेल्या वर्षभरापासून पंतप्रधान भेटीसाठी वेळ का देत नाहीत, आम्हाला कोणाकडेही बोट किंवा हातही दाखवायचा नाही. अगदी त्यांच्याकडे नजरही वळवायची नाही. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने तशी वेळ आमच्यावर आणली आहे, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
“आदु… तुझ्या पप्पांनी केंद्र सरकारकडुन तुझ्यासाठी बायकोच मागायची सोडली आहे फक्त”
आसाराम बापूंना ICU मध्ये केलं दाखल; काही दिवसांपूर्वी झाली होती कोरोनाची लागण
“मराठा आरक्षण हा पेटवापेटवीचा विषय नाही, हे विरोधकांनीही नीट समजून घेतले पाहिजे”
“माजी केंद्रीय मंत्री अजित सिंह यांचं कोरोनामुळे निधन”