नागपूर : मराठा समाजाला दिलेले आरक्षण जर टिकले असते तर त्याचे सर्व श्रेय भाजपला मिळाले असते. म्हणून महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणचा मुडदा पाडल्याचा सनसनाटी आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
आम्ही केलेला कायदा या सरकारला टिकवता आला नाही, कारण तो टिकला असता तर त्याचे श्रेय भाजपला मिळाले असते, म्हणून या सरकारने जाणीवपूर्वक या आरक्षणाचा मुडदा पडला असे फडणवीस म्हणाले. ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, जर आज आम्ही सत्तेत राहिलो असतो तर जसे आम्ही उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा कायदा टिकविला होता, सरन्यायाधीश यांच्या समोरही त्यास स्थगिती येऊ दिली नव्हती तसेच समनव्य साधून आम्ही सर्वोच्च न्यायालयातही तो कायदा टिकविला असता असा दावाही फडणवीसांनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी –
ठाकरे सरकारने मराठा आरक्षणाचे सगळ्या बाजूने तीन तेरा वाजवले- निलेश राणे
हा निर्णय दुर्दैवी असला, तरी या निर्णयाला गरीब मराठा समाजही दोषी- प्रकाश आंबेडकर
मराठा आरक्षण! “गनिमी कावा करा”; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारला सल्ला
मराठा बांधवांना न्याय देण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल- अजित पवार