Home महाराष्ट्र माझं वर्षभराचं मानधन राज्यासाठी देणार- बाळासाहेब थोरात

माझं वर्षभराचं मानधन राज्यासाठी देणार- बाळासाहेब थोरात

मुंबई : आपलं वर्षभराचं मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देण्याची घोषणा काँग्रेस नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज केली. त्याचबरोबर मोफत लसीकरणाबाबत महाविकास आघाडीचं एकमत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

आम्ही लसीकरणाबाबत आग्रही आहोत. मात्र लसीकरणासाठी येणारा खर्च मोठा आहे. म्हणूनच माझं वर्षभराचं मानधन राज्यासाठी देणार आहे. तसेच यासोबतच काँग्रेसचे 53 आमदार आपलं महिन्याभराचं मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरम्यान, मोफत लसीकरणासाठी सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे दोघेही आग्रही असल्याचं बाळासाहेब थोरातांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण”

धक्कादायक!”…अन् त्याच्यावर आईचा मृतदेह बाईकवरुन स्मशानात नेण्याची वेळ”

धोनी ब्रिगेडची विजयी घोडदौड; चेन्नईचा हैदराबादवर 7 विकेट्सने विजय

“गिरीश भाऊंना राजकारणात मी आणलं, म्हणून आज गिरीश भाऊ दिसत आहेत”