Home महाराष्ट्र “देवेंद्र फडणवीस नागपुरमध्ये ठाण मांडून बसले म्हणूनच तिथला कोरोना आटोक्यात आला”

“देवेंद्र फडणवीस नागपुरमध्ये ठाण मांडून बसले म्हणूनच तिथला कोरोना आटोक्यात आला”

मुंबई : राज्यात कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात होत आहे. अशातच रुग्णांना बेडस् उपलब्ध होत नसल्यामुळे रूग्णांना कुठे खुर्चीवर, कुठे गाडीमध्ये, कुठे जमिनीवर, तर कुठे झाडाखाली ऑक्सिजन लावण्यात येत आहे. म्हणूनच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरून लोकांसाठी काम करत असल्याचं म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना राज्य सरकार मात्र फक्त केंद्रावर टीका करण्यात व्यस्त आहे, असं प्रवीण दरेकर म्हणाले. कांदिवली येथील भुराभाई आरोग्य भवन कोविड सेंटर आणि नित्यानंद मनपा शाळा अंधेरी येथे रविंद्र जोशी फाउंडेशन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने उभारलेल्या कोविड केअर सेंटरचा लोकार्पण कार्यक्रम पार पडला. त्यात ते बोलत होते.

दरम्यान, एकीकडे सरकार केवळ आरोप करण्यात व्यस्त असताना फडणवीस यांच्यासारखे जनतेचे खरे प्रतिनिधी अहोरात्र मेहनत करून वेगवेगळ्या सुविधा जनतेला उपलब्ध करून देत आहेत. अशीच मेहनत करून लवकरात लवकर राज्याला व पर्यायाने देशाला आपण कोरोनामुक्त करूया, असं प्रविण दरेकर यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“परमबीर सिंग यांनी हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला; अकोल्यातील पोलीस अधिकाऱ्याचा आरोप

लसींच्या दराबाबत मुख्यमंत्री, पंतप्रधान गप्प का?; प्रकाश आंबेडकरांचा सवाल

“कर्नाटकात उद्यापासून 14 दिवसांचा लाॅकडाऊन”

“…त्यामुळे महाविकास आघाडीतील बोलघेवड्या नेत्यांनी रोज उठून कांगावा करु नये”