चेन्नई : IPL 2021 हंगामातील 20 वा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला.या सामन्यात हैदराबादने दिल्लीच्या धावंसंख्येची बरोबरी केली त्यामुळे सामना सुपर ओव्हर गेला. सुपर ओव्हरमध्ये दिल्लीने संघाने विजय मिळवला.
दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली होती. त्यानुसार दिल्लीने 20 षटकात 4 बाद 159 धावा करत हैदराबादला 160 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना 20 षटकाच हैदराबादलाही 7 बाद 159 धावाच करता आल्या. त्यामुळे सामना सुपर ओव्हर मध्ये खेळवला गेला.
सुपर ओव्हरमध्ये हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 7 धावा करत दिल्लीसमोर 8 धावांचे आव्हान ठेवले होते. सुपरओव्हरमध्ये हैदराबादकडून केन विलियम्सन आणि कर्णधार डेव्हिड वॉर्नरने फलंदाजी केली. तर दिल्लीकडून अक्षर पटेलने गोलंदाजी केली.
दरम्यान, दिल्लीकडून रिषभ पंत आणि शिखर धवन फलंदाजीसाठी उतरले. त्यांनी 6 चेंडूत 8 धावा करत दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. हैदराबादकडून राशिद खानने गोलंदाजी केली.
महत्वाच्या घडामोडी –
ताई, टेस्ट निगेटिव्ह असली तरी…; धनंजय मुंडेंच बहिणीसाठी काळजीयुक्त ट्विट
ऑक्सिजन निर्मितीसाठी केंद्राने दिलेला निधी राज्याने गायब केला- प्रसाद लाड
“जोतीबा यात्रेवर कोरोनाचं सावट; मानकरीच पाॅझिटिव्ह आल्याने यात्रा रद्द”
सुजय विखे यांनी त्या बाॅक्समधून नेमकं काय आणलं?- रूपाली चाकणकर