“सत्तेसाठी एवढी लाचारी?, कुठे फेडाल ही पापं?”

0
395

मुंबई : सध्या राज्यात संभाजीनगरच्या नामांतरचा मुद्द्यावरुन भाजपा चांगलीच आक्रमक झाली असून, सत्ताधारी शिवसेनेला यावरून कोंडीत पकडले जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आशीष शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

स्वतःच्या अहंकाराचा विषय येतो तेव्हा “उखाड दिया” ची भाषा..आणि आता संभाजीनगरचा राज्याच्या अस्मितेचा विषय येताच काँग्रेसला “कोपरापासून साष्टांग दंडवत”! सत्तेसाठी एवढी लाचारी? कुठे फेडाल ही पापे सारी?” असं म्हणत भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

दरम्यान महाविकासआघाडीतील एक प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसचा औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असे करण्यास विरोध आहे. तर, शिवसेनेकडून ही आम्ही संभाजीनगर असे नाव करणारच असल्याचं वारंवार सांगितलं जात आहे. मात्र, अद्याप हा प्रश्न निकाली निघाला नसल्याने भाजपा नेत्यांकडून शिवसेनेवर टीका करण्यात येत आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

“हे राष्ट्रवादी नसून भ्रष्टवादी आहेत”

आदित्य म्हणजे आजोबांचं स्वप्न पूर्ण करणारा, वाघाचं हृदय असणारा खरा नातू- सुधीर मुनगंटीवार

आम्ही तोंड उघडलं तर भाजप नेत्यांचे काळे कारनामे बाहेर येतील- अमोल मिटकरी

“धनंजय मुंडे यांना मी ओळखत नाही, त्यांच्या मदतीसाठी पुढे येण्याचा संबंध नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here