इतके गुन्हेगार एका जेलमध्ये नसतील तितके राष्ट्रवादीत आहेत- निलेश राणे

0
675

मुंबई : धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचा आरोप आणि नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली, यावरुन भाजपा नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधलाय.

राष्ट्रवादीत चाललंय काय?? इतके क्रिमिनल मिळून एका जेल मध्ये नसतील तितके एका पक्षात आहेत, असं म्हणत निलेश राणेंनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे.

काय चाललंय महाराष्ट्रात? मुंबईचे सहपोलिस आयुक्त एका बलात्काराच्या मॅटरसाठी एका पक्षाच्या नेत्याला कसे भेटू शकतात आणि ते पण त्यांच्या घरी? हा तर केस झाकायचा अजेंडा दिसतो. अशाने पोलिसांवरील लोकांचा विश्वास उडेल, असं निलेश राणे म्हणाले.

दरम्यान, सामान्य लोकांसाठी ही सुविधा आहे का हे पण आयुक्तांनी सांगावं, असंही निलेश राणे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून तातडीने हकालपट्टी करा- तृप्ती देसाई

भाजपच्या ‘या’ नेत्याचा रेणू शर्मांवर गंभीर आरोप; धनंजय मुंडे प्रकरणाला वेगळ वळण

“धनंजय मुंडे राष्ट्रवादी कार्यालयात दाखल; राजीनामा देण्याची तयारी?”

राष्ट्रवादीला इब्रत राखायची असेल तर राजीनामा घेतल्याशिवाय पर्याय नाही- प्रकाश आंबेडकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here