मुख्यमंत्री महोदय काय चाललंय आपल्या राज्यात?; बलात्काराच्या घटनांवरुन चित्रा वाघ कडाडल्या

0
909

मुंबई : राज्यात एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या ठिकाणी बलात्काराच्या घटना समोर आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ट्विटरवर जाब विचरला आहे.

मुख्यमंत्री महोदय काय चाललंय आपल्या राज्यात? ही शिवशाही नाही तर मोगलाई फोफावत आहे”, असं म्हणत चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे.

कोल्हापूरात गर्भवती महिलेवर सामुहीक बलात्कार, औरंगाबादमध्ये ही सामुहीक बलात्काराची घटना, वाशिम मध्येही चालत्या खाजगी बसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आजच्या एका दिवसातल्या या तीन घटना आहेत. मुख्यमंत्री महोदय काय चाललंय आपल्या महाराष्ट्रात. ही शिवशाही नाही, ही तर मोगलाई फोफावतेय, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

एकीकडे सत्तेत राहून आंदोलन करायचे आणि…; सदाभाऊ खोत यांची राजू शेट्टींवर टीका

“सुरक्षा कपातीसारख्या राजकीय उठाठेवी करण्यापेक्षा जनतेच्या हिताकडं लक्ष द्या”

नितेश राणे हे हँग आहेत, त्यांना काही कळत नाही; शिवसेनेची टीका

MPSC परीक्षेच्या तारखा जाहीर; ‘या’ तारखेला होणार राज्यसेवा पूर्व परीक्षा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here