Home महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेच्या तोंडाला पानं पुसली; चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेच्या तोंडाला पानं पुसली; चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

मुंबई : वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे 15 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी आज रात्री 8 वाजल्यापासून 15 दिवस राज्यात कलम 144 लागू केलं आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात 15 दिवसांच्या संचारबंदीच्या नावाखाली प्रत्यक्षात लॉकडाऊन लागू केला. हे करताना त्यांनी गरीब गरजू वर्गाला मदत केल्याचा आव आणला. मात्र, प्रत्यक्षात अत्यंत तुटपुंजी तरतूद करून त्यांनी जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत, असा हल्लाबोल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

दरम्यान, राज्यात निर्बंधांची घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी सामान्य जनतेला मोठी मदत केल्याचं दाखवत शब्दांचे खेळ केले आहेत, अशी टीकाही चंद्रकांत पाटलांनी यावेळी केली.

महत्वाच्या घडामोडी –

एवढा दरिद्री आहे का महाराष्ट्र माझा?, मुख्यमंत्र्यांंनी जरा विचार करून बोलावं- अतुल भातखळकर

उद्या संध्याकाळी 8 वाजल्यापासून राज्यात संचारबंदी; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मी कच्च्या गुरुचा चेला नाही; धनंजय मुंडेंचा भाजपला इशारा

“राज्यात उद्या मध्यरात्री 12 वाजलेपासून लाॅकडाऊन?”