Home महाराष्ट्र एवढा दरिद्री आहे का महाराष्ट्र माझा?, मुख्यमंत्र्यांंनी जरा विचार करून बोलावं- अतुल...

एवढा दरिद्री आहे का महाराष्ट्र माझा?, मुख्यमंत्र्यांंनी जरा विचार करून बोलावं- अतुल भातखळकर

मुंबई : वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे 15 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी आज रात्री 8 वाजल्यापासून 15 दिवस राज्यात कलम 144 लागू केलं आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी यावेळी गरजूंसाठी अनेक घोषणा केल्या. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया देत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्राची लोकसंख्या सध्या 12 कोटी आहे. या 12 कोटी लोकसंख्येपैकी अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी 7 कोटी कसे आहेत? एवढा दरिद्री आहे का महाराष्ट्र माझा?, असा प्रश्न अतुल भातखळकर यांनी यावेळी उपस्थित केला. तर मुख्यमंत्री महोदय बोलताना थोडा विचार आणि बोलण्यापूर्वी थोडा अभ्यास केलात तर बरं होईल, असा सल्ला देखील भातखळकरांनी यावेळी ठाकरे सरकारला दिला.

महत्वाच्या घडामोडी –

उद्या संध्याकाळी 8 वाजल्यापासून राज्यात संचारबंदी; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मी कच्च्या गुरुचा चेला नाही; धनंजय मुंडेंचा भाजपला इशारा

“राज्यात उद्या मध्यरात्री 12 वाजलेपासून लाॅकडाऊन?”

“करेक्ट कार्यक्रम हा शब्द चोरल्यासारखा वाटतो, हा शब्द नेमका कुणाचा हे सर्वांना माहीतेय”