Home महत्वाच्या बातम्या उद्या संध्याकाळी 8 वाजल्यापासून राज्यात संचारबंदी; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

उद्या संध्याकाळी 8 वाजल्यापासून राज्यात संचारबंदी; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या महिन्याभरात सातत्याने रुग्णसंख्येत वाढ होत आहे. अशातच महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू होणार की कठोर निर्बंध? या मुद्द्यावरून चर्चा पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज राज्यातल्या जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला.

नाईलाजाने आपल्याला काही निर्बंध घालावे लागणार आहेत. चर्चेत आपण बराच वेळ घालवला आहे. आता निर्णय घेण्याचा क्षण आला आहे. आपल्याला रोजीरोटी महत्त्वाची आहेच. पण त्याआधी जीव वाचवणं आवश्यक आहे. सध्या तोच आपल्यासमोरचा महत्त्वाचा मुद्दा आहे. उद्या संध्याकाळी 8 वाजल्यापासून हे निर्बंध लागू होतील, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

पंढरपूर मंगळवेढ्याचं मतदान आहे. ते झाल्यानंतर तिथे देखील निर्बंध लागू होतील. उद्या संध्याकाळपासून आपण ब्रेक द चेनं लागू करत आहोत. राज्यात 144 कलम लागू होणार. याचा अर्थ पुढचे किमान 15 दिवस राज्यात संचारबंदी लागू असेल. अनावश्यक प्रवास पूर्णपणे बंद करावा लागेल. योग्य कारण नसेल, तर घराबाहेर पडायचं नाहीये, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

मी कच्च्या गुरुचा चेला नाही; धनंजय मुंडेंचा भाजपला इशारा

“राज्यात उद्या मध्यरात्री 12 वाजलेपासून लाॅकडाऊन?”

“करेक्ट कार्यक्रम हा शब्द चोरल्यासारखा वाटतो, हा शब्द नेमका कुणाचा हे सर्वांना माहीतेय”

“मुख्यमंत्री आजच लाॅकडाऊनबद्दल निर्णय घेणार, नियमावलीही आजच तयार होणार”