“सत्तार यांनी आयुष्यभर टोपी लावूनच ठेवावी, हवं तर आम्ही त्यांना टोप्या पुरवू”

0
529

मुंबई : जोपर्यंत रावसाहेब दानवे यांचा पराभव करत नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही, असं वक्तव्य राज्याचे महसूल आणि ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलं होतं. यावर भाजप नेते गिरीष महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सत्तार यांनी आयुष्यभर टोपी लावूनच ठेवावी, हवं तर आम्ही त्यांना टोप्या पुरवू, असं म्हणत गिरीश महाजनांनी सत्तारांना प्रत्युत्तर दिलं आहे. ते टी.व्ही.9 मराठीशी बोलत होते.

दरम्यान, अब्दुल सत्तार हे युतीतून निवडून आले आहेत. याचं त्यांनी भान ठेवावं. रावसाहेब दानवे यांचं काम मोठं आहे. त्यांच्या मतदारसंघात त्यांनी प्रचंड काम केलं आहे. त्यामुळे सत्तारांनी आयुष्यभर टोपी लावूनच ठेवावी, हवं तर आम्ही त्यांना टोप्या पुरवू, असं म्हणत महाजनांनी सत्तारांना टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीचा अपघात”

“पुण्यात मनसेचं खळखट्याक; कोंढव्यातील ॲमेझॉनचं ऑफिस फोडलं”

“BREAKING NEWS! अभिनेता रजनीकांत रूग्णालयात दाखल”

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा; सिराज-गिल यांचं पदार्पण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here