Home क्रीडा दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा; सिराज-गिल यांचं पदार्पण

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा; सिराज-गिल यांचं पदार्पण

बॉक्सिंग डे कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. शुभमन गिल आणि मोहम्मद सिरज यांचं कसोटी पदार्पण होणार आहे. दुसऱ्या कसोटीसाठी निवडण्यात आलेल्या अंतिम 11 खेळाडूंमध्ये मोहम्मद सिराज आणि शुबमन गिल यांची निवड करण्यात आली आहे.

पहिल्या कसोटी सामन्यातील दारूण पराभवानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. पृथ्वी शॉ आणि वृद्धीमान साहाला आराम देण्यात आला आहे. त्यांच्या जागी मोहम्मद सिराज व शुभमन गिल यांनी संघात संधी देण्यात आली आहे.

अष्टपैलू रविंद्र जडेजा दुखापतीतून सावरला असून अंतिम 11 खेळाडूमध्ये त्याला संधी देण्यात आली आहे. अश्निन आणि जडेजा फिरकीपटूची धुरा सांभाळतील. तर बुमराह आणि उमेश यादव यांच्यासोबत मोहम्मद सिराज वेगवान गोलंदाजाची धुरा सांभाळणार आहे.

दरम्यान, पहिल्या कसोटीतील खराब कामगिरीनंतर वृद्धिमान साहाला आराम देण्यात आला आहे. त्याच्या जागी विकेटकीपर फलंदाज रिषभ पंतला संघात स्थान देण्यात आलं आहे. तसेच विराट कोहलीच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची धुरा अजिंक्य रहाणेकडे सोपविण्यात आली आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी असा असेल भारतीय संघ :

अजिंक्य रहाणे (कर्णधार), मयांक अगरवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

महत्वाच्या घडामोडी-

नाईट कर्फ्युवरून केलेल्या टीकेला उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर; म्हणाले…

“जोपर्यंत रावसाहेब दानवे यांचा पराभव करत नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही”

“उत्तरप्रदेश हादरलं! सामुहिक बलात्काराची तक्रार द्यायला गेलेल्या पीडितेवर पोलीस ठाण्यात पुन्हा बलात्कार”

“फ्लिपकार्टने मराठी केलं, आता ॲमेझाॅनची मस्ती उतरवणार”