कोण संजय राऊत?; चंद्रकांत पाटलांची संजय राऊतांवर टीका

0
415

अहमदनगर : कांजूरमार्ग मेट्रो कारशेडबाबत कोर्टाने दिलेल्या निर्णयावर संजय राऊत यांनी टीका करत उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय दुर्दैवी आहे, असं संजय राऊत म्हणाले होते, त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय.

न्यायालयाने निर्णय द्यायचा नाही, मग काय यांची दादागिरी चालणार का?, कोण संजय राऊत”, असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

घटनेच्या चौकटीतील गोष्टी मानाव्या लागतील. एखाद्या घटनेसंदर्भात न्यायालयात जा‌यचे नाही का?, असा सवाल करत यांना निवडणूक आयोग आणि कोर्टाचे निर्णय मान्य नाहीत, असं चंद्रकांत पाटीव म्हणाले.

दरम्यान, डॉ. बाबासाहेबांच्या घटनेवर देशाचा कारभार उत्तम सुरू आहे आणि पुढेही सुरू राहील. हे सर्व तुम्हाला मान्य नाही का?, असं म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.

महत्वाच्या घडामोडी-

अजित पवारांची ताकद असती तर फडणवीसांचं सरकार टिकलं असतं; चंद्रकांत पाटलांचा टोला

राज्य सरकारला अहंकारी म्हणणाऱ्या फडणवीसांना संजय राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामना! विराट कोहलीची एकाकी झुंज, पहिल्या दिवसाअखेर भारत 6 बाद 233

संजय राऊत यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी- प्रवीण दरेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here