Home महाराष्ट्र “राज्य सरकारकडून कोरोनाच्या नव्या गाईडलाईन्स जारी, ऑफिसमध्ये 50 टक्के कर्मचारी ठेवण्याची सूचना”

“राज्य सरकारकडून कोरोनाच्या नव्या गाईडलाईन्स जारी, ऑफिसमध्ये 50 टक्के कर्मचारी ठेवण्याची सूचना”

मुंबई : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने कोरोनाच्या नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहे.

राज्यातील सर्व खासगी कार्यालय आणि आस्थापनांमध्ये 50 टक्के कर्मचारीही संख्या ठेवा, अशी सूचना करण्यात आली आहे. तसेच धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे आणि सभा अशा इतर कारणांसाठी गर्दी करता येणार नाही, अशीही सूचना देण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या कोरोनाबाबत नव्या सूचना

राज्यातील सर्व खासगी कार्यालये आणि आस्थापनांमध्ये 50 टक्के कर्मचारी संख्या ठेवा

नाट्यगृहे आणि सभागृहे यामधील उपस्थिती देखील 50 टक्के संख्या असावी

आरोग्य आणि अत्यावश्यक सेवा तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळण्यात आलं

सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांच्या विभाग आणि कार्यालय प्रमुखांनी कोविड परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावे

धार्मिक, सामाजिक, राजकीय , सांस्कृतिक मेळावे व सभा अशा इतर कारणांसाठी गर्दी करता येणार नाही

महत्वाच्या घडामोडी –

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच सचिन वाझेंचे गॉडफादर- नारायण राणे

“…मग तुमच्या काळात दहशतवादी कृत्य अन् खंडण्या वसूल करायला अधिकारी नियुक्त केले का?”

इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी

“राजस्थान हादरलं! ICU मध्ये व्हेंटिलेटरवर असलेल्या महिलेवर वाॅर्ड बाॅयनं केला रात्रभर बलात्कार”