Home देश वर्षभरात देशातील सर्व टोल नाके हटवणार; नितीन गडकरींची मोठी घोषणा

वर्षभरात देशातील सर्व टोल नाके हटवणार; नितीन गडकरींची मोठी घोषणा

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत आज एक मोठी घोषणा केली आहे. येणाऱ्या वर्षभरात देशातील सर्व टोल नालके हटवण्यात येतील असं त्यांनी सांगितलं.

टोल हटवणे म्हणजे नागरिकांना टोलपासून मुक्ती मिळेल असा अर्थ नसून फक्त टोल नाके बंद होतील. परंतु, महामार्गावर द्याव्या लागणाऱ्या करापासून मुक्तता होणार नाही, असंही गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केलं. बसपाचे खासदार कुंवर दानिश आली यांनी टोलचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर नितीन गडकरी यांनी त्यावर उत्तर दिलं.

दरम्यान, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिमद्वारे महामार्गावर प्रवेश करतेवेळी गाडीचा एक फोटो घेतला जाईल आणि महामार्ग सोडताना एक फोटो घेतला जाईल, त्याद्वारे जेवढा प्रवास आपण केला असेल तेवढेच पैसे आपल्या बँक खात्यावरून टोल स्वरूपात वजा करण्यात येतील.

महत्वाच्या घडामोडी –

सचिन वाझेंची हत्या होऊ शकते, त्यांना मुंबई पोलिसांपासून दूर ठेवा- रवी राणा

‘या’ युवा गोलंदाजाने केलं धोनीला बोल्ड, दूर उडून पडली दांडी; पहा व्हिडिओ

‘ही’ कारवाई म्हणजे वरवरची मलमपट्टी; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारवर निशाणा

संजय राऊत यांना गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री करा; चंद्रकांत पाटलांचा टोला