Home महाराष्ट्र “हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलिस आयुक्त”

“हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलिस आयुक्त”

मुंबई : सचिन वाझे प्रकरणी अखेर मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या ऐवजी हेमंत नगराळे यांना मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबईच्या पोलीस आयुक्तपद हे डीजी दर्जाचं आहे. त्याच दर्जाचा अधिकारी या पदावर असावा म्हणून नगराळे यांच्याकडे हे पद सोपवण्यात आलं आहे.

हेमंत नगराळे हे 1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. हेमंत नगराळे यांचा 19 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. हेमंत नगराळे यांनी 2016 मध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा कारभार स्वीकारला होता. त्यानंतर 2018 मध्ये त्यांची नागपुरात बदली झाली. नगराळे सध्या पोलिस महासंचालक (विधी आणि तंत्रज्ञान) म्हणून कार्यरत आहेत.

दरम्यान, नगराळे यांना सेवेबद्दल अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक मिळालं आहे. तसेच विशेष सेवा पदक आणि आंतरिक सुरक्षा पदकानेही सन्मानित करण्यात आलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

आशिष शेलारांचे आरोप बालिशपणाचे, त्यांची कीव येते- नाना पटोले

“मराठी फिल्म इंडस्ट्रीजमधील ‘या’ CUTEST COUPLE ला कोरोनाची लागण”

“एरवी दुपारनंतर कामाला सुरुवात करणारे उद्धव ठाकरे वाजेंसाठी इतक्या बैठका का घेतायत?”

“NIA चा मोठा खुलासा! सीसीटीव्हीत दिसणारी व्यक्ती सचिन वाझेच”