Home महाराष्ट्र “शरद पवारांनीच अनिल देशमुखांना तात्काळ घरी पाठवावं”

“शरद पवारांनीच अनिल देशमुखांना तात्काळ घरी पाठवावं”

मुंबई : अँटालिया आणि मनसुख हिरेन प्रकरणात सर्व पुरावे असतानाही देशमुख यांनी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देशमुखांची हकलपट्टी करावी अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.

किरीट सोमय्या यांनी मनसुख हिरेन यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्याशी विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला.

2004 मध्ये वाझेंची हकालपट्टी करण्यात आली होती. 2007मध्ये ते सेवेतून मुक्त झाले. या दोन्हीवेळा राष्ट्रवादीचाच गृहमंत्री होता. असं असतानाही वाझेंना आता सेवेत घेण्यात आलं आणि चांगली पोस्टिंग दिली. तसंच मनसुख हिरेन प्रकरणात वाझेंना वाचवण्याचा देशमुख यांनी प्रयत्न केला. वाझेंवर कारवाई करण्यात दिरंगाई केली. त्यामुळे देशमुख यांची पवारांनी हकालपट्टी करावी, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

दरम्यान,शरद पवारांनी एक तर देशमुख यांची हकालपट्टी करावी किंवा त्यांनीच या प्रकरणावर भाष्य करा, असंही किरीट सोमय्या म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

“अहमदनगरमध्ये भाजपला धक्का; ‘या’ मोठ्या नेत्यानं केला राष्ट्रवादीत प्रवेश”

…तर शिवसेनेची ‘ती’ प्रकरणं बाहेर काढेन; नितेश राणेंचा वरुण सरदेसाईंना इशारा

मोठी बातमी! सुशील कुमार शिंदे यांची मुलगी आणि जावयाची मालमत्ता ED कडून जप्त

डान्स करताना अभिनेत्री उर्वशी राैतेलासोबत नको ते घडलं; पहा व्हिडिओ