Home महाराष्ट्र “…तर उद्धव ठाकरे पक्षप्रमुख पण राहणार नाहीत”

“…तर उद्धव ठाकरे पक्षप्रमुख पण राहणार नाहीत”

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज सुरू असताना इंग्रजी भाषेच्या वापराला विरोध करत शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचा, मात्र तरीही मराठीसाठी अर्थसंकल्पात काहीच नाही, मी मेल्यावर साहेबांना भेटलो तर मराठी भाषेसाठी काय केलं तर मी काय उत्तर देऊ?, असा सवाल केला होता. त्यावरुन भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.

जुन्या शिवसैनिकांची ठाकरे सरकारमध्ये अवस्था इतकी वाईट झाली आहे की सभागृहात “आम्ही मेल्यावर बाळासाहेबांना काय सांगणार” असं बोलून गेले, असा टोला निलेश राणेंनी लगावला आहे.

उद्धव ठाकरे फक्त 35 टक्के शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. शिवसेनेत सर्व्हे आणि प्रमुख पदासाठी मतदान झालं तर उद्धव ठाकरे पक्षप्रमुख पण राहणार नाही, असं निलेश राणे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

…अन् भर पत्रकार परिषदेत खासदाराने महिला आमदाराच्या गालाला लावला हात; व्हिडिओ व्हायरल

लस देण्यासाठी नर्सने हात लावला, अन् पोलीस कर्मचाऱ्याला हसू आवरेना; व्हिडीओ होतोय व्हायरल

“देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्रावर इतका राग का आहे, हेच समजत नाही”

पुण्याच्या ‘त्या’ आजींचा दिल्लीत सत्कार; आजीबाईंचा काठीचा खेळ पाहून केजरीवालही झाले अवाक, पाहा व्हिडिओ