Home महाराष्ट्र “विरोधकांनी मनसुख हिरेन प्रकरण राजकीय प्रतिष्ठेचं करू नये”

“विरोधकांनी मनसुख हिरेन प्रकरण राजकीय प्रतिष्ठेचं करू नये”

मुंबई : सरकारने मुंबई पोलिसांच्या तोंडाला काळं फासलं आहे, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

मुंबई पोलिसांच्या तोंडाला काळं कोणी फासलं? विरोधी पक्षाने पोलिसांच्या तोंडाला काळं फासू नये. देवेंद्र फडणवीस हे 5 वर्ष सत्तेत होते. पोलिसांचं काम कसं चालतं हे त्यांना माहीत आहे. त्यांनी अशी भाषा करू नये, असं संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावर भाष्य करत विरोधकांना चांगलंच सुनावलं आहे. मनसुख हिरेन मृत्यूप्रकरण कोणीही राजकीय प्रतिष्ठेचा विषय करू नये. कुणाचाही मृत्यू वाईटच असतो. मग तो अन्वय नाईक यांचा असो, नाईक यांच्या आईचा असो, मोहन डेलकर यांचा असो की मनसुख हिरेन यांचा असो. अनैसर्गिक मृत्यूचा तपास व्हायलाच हवा, असंही राऊत यांनी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“…तर उद्धव ठाकरे पक्षप्रमुख पण राहणार नाहीत”

…अन् भर पत्रकार परिषदेत खासदाराने महिला आमदाराच्या गालाला लावला हात; व्हिडिओ व्हायरल

लस देण्यासाठी नर्सने हात लावला, अन् पोलीस कर्मचाऱ्याला हसू आवरेना; व्हिडीओ होतोय व्हायरल

“देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्रावर इतका राग का आहे, हेच समजत नाही”