Home महत्वाच्या बातम्या पुण्याच्या ‘त्या’ आजींचा दिल्लीत सत्कार; आजीबाईंचा काठीचा खेळ पाहून केजरीवालही झाले अवाक,...

पुण्याच्या ‘त्या’ आजींचा दिल्लीत सत्कार; आजीबाईंचा काठीचा खेळ पाहून केजरीवालही झाले अवाक, पाहा व्हिडिओ

नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या काळात एक पुण्यातल्या आजीबाई काठीच्या साहसी खेळामुळं प्रसिद्ध झाल्या होत्या. त्याच आजीबाईंचा दिल्लीत महिला आयोगाकडून आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडून सत्कार करण्यात आला.

सत्कार झाल्यानंतर मी सध्या 10 अनाथ मुलांना शिकवते आहे. ही काठी फिरवून मी काही पैसे कमवते. मी स्वतः कमवते आणि पोरांना देखील उभं करते. असं म्हणत आजीबाईंनी सर्वांचे आभार मानले.

पुण्याच्या हडपसरमध्ये राहणाऱ्या आजीबाई म्हणजेच शांताबाई पवार या लॉकडाऊन काळात हातात काठी घेऊन रस्त्यावर उतरल्या होत्या. आपली आणि अनाथ पोरांच्या उपजीवीका भागवण्यासाठी त्या भर कोरोना काळात साहसी खेळ करण्यासाठी रस्त्यावर आल्या होत्या.  85 वर्षाच्या शांताबाई यांचे साहसी खेळ तरूणांना देखील लाजवेल असे होते.

दरम्यान, शांताबाई पवार यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे त्या फक्त महाराष्ट्रात नव्हे तर संपुर्ण देशभरात शांताबाई ओळखल्या गेल्या. अभिनेता सोनु सूदनं शांताबाईंना आर्थिक मदतही केली होती. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खास पुण्यात आल्यावर या आजीबाईंची भेट घेतली आणि त्यांना 1 लाख आणि साडी देऊन सत्कार त्यांचा केला होता.

महत्वाच्या घडामोडी –

“मोठी बातमी! जळगावमध्ये 3 दिवसांचा जनता कर्फ्यू”

…तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अनेकजण अडचणीत येतील; शिवेसेनेच्या ‘या’ नेत्याचं मोठं वक्तव्य

“अध्यक्ष महोदय मी दुखावलो गेलोय, राहुल गांधी यांना शाळेत पाठवण्यात यावं”

“नाशिकमध्ये उद्यापासून अत्यावश्यक सेवा वगळता रात्री 7 ते सकाळी 7 पूर्णपणे बंद”