जयपूर : राजस्थान येथील अलवार भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीविरोधात तक्रार देण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये गेलेल्या 26 वर्षीय महिलेवर एका पोलिस उपनिरीक्षकानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यानंतर या महिलेने त्या पोलिस उपनिरीक्षकाविरोधात पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली.
महिलेने केलेल्या तक्रारीनुसार, पोलीस ठाण्यात 54 वर्षीय पोलीस उपनिरीक्षक भरत सिंह यांनी मला पतीसोबत सामंजस्याने तोडगा काढू असं सांगत मला जाळ्यात ओढलं आणि 3 दिवस माझ्यावर बलात्कार केला. भरत सिंहने मला पोलीस ठाण्याच्या मागे असलेल्या त्याच्या कार्यालयात आणि घरी घेऊन जात माझ्यावर बलात्कार केला, असं महिलेनं तक्रारीत सांगितलं आहे. त्यानंतर महिलेला 7 मार्च रोजी पोलीस ठाण्यात बोलावलं होतं तेव्हा तिने विरोध केला. मात्र दुपारनंतर जेंव्हा ती महिला पोलीस ठाण्यात पोहोचली तेव्हा तिने भरत सिंह यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप करत तक्रार दिली. या प्रकरणाची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस ठाण्यात पोहोचले आणि संपूर्ण घटनेची माहिती घेतली.
दरम्यान, पोलीस महासंचालक हवासिंह घुमरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक चौकशीत भरत सिंह दोषी आढळल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे, असं घुमरिया यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
भाजपला पुन्हा धक्का; ‘या’ दिग्गज नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
मराठा आरक्षण प्रश्नी मोदी सरकारने समाजाच्या व महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला- सचिन सावंत
जणू काही सेहवागच डाव्या हाताने खेळत होता; इंझमाम उल हककडून ऋषभ पंतचं काैतुक
यालाच म्हणायचं चोराच्या उलट्या बोंबा; जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर