नागपूर : जळगावमधील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करण्यास भाग पाडण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून जिल्हाधिकाऱ्यांकडे यासंबंधी तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलीस कर्मचारी आणि वसतिगृहाबाहेरील काही पुरुष सहभागी असल्याचा आरोप आहे. या प्रकारणावर संताप व्यक्त करत भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
सुधीर मुनगंटीवार यांनी सरकार काहीच कारवाई करत नसल्याचं सांगत आमच्या आई-बहिणीची थट्टा होणार असेल तर राष्ट्रपती राजवट हा एकच मार्ग आहे, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.
सभागृहात सदस्यांनी अतिशय गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे. हा इतका गंभीर विषय आहे अध्यक्ष महोदय की, उद्या माझी बहीण, तुमची बहीण एवढं एक सेकंद नजरेत आणा…तुम्ही जर गृहमंत्री असता तर खून केला असता. अशा पद्धतीने तुमच्या, माझ्या आई बहिणीला नग्न करुन, कपडे काढून नाचायला लावलं जातंय आणि आम्ही नोंद घेवू म्हणतात. इथं मृत मनाचे आमदार आहेत? आमचं मन जिवंत आहे. तळपायाची आग मस्तकात गेली पाहिजे, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, उत्तरात सांगितलं पाहिजे की, एक तासात चौकशी करतो. काय कारवाई करणार आहे याचा अहवाल घेतो…पण म्हणतात नोंद घेतो…हे पाप फेडावं लागेल. आमच्या आई-बहिणीला नग्न केलं जातं या महाराष्ट्रात आणि आम्ही नोंद घेतो,” अशा शब्दांत सुधीर मुनगंटीवार यांनी जळगावमधील घटनेवर संताप व्यक्त केला.
महत्वाच्या घडामोडी –
“मोठी बातमी! तापसी पन्नू, अनुराग कश्यप यांच्या घरी इन्कम टॅक्सची धाड”
“तरूणीसोबत अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपच्या मंत्र्याचा राजीनामा”
“याॅर्करकिंग जसप्रित बुमराहची पडली विकेट, लवकरच अडकणार विवाहबंधनात”
राहुल गांधींनी आता जनतेसमोर उठाबश्या काढाव्यात- आशिष शेलार