मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचं नाव समोर येत होतं. याच पार्श्वभूमीवर वनमंत्री संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
संजय राठोड यांनी आधीच राजीनामा दिला असता तर त्यांची प्रतिमा इतकी मलिन झाली नसती. आता उशिरा राजीनामा दिल्याने प्रतिमा उजळेल असं नाही. मात्र चुकीच्या प्रवृत्तींना आळा घातलाच गेला पाहिजे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
दरम्यान, संजय यांनी राजीनामा दिला हा मुद्दा नसून निष्पक्षपणे चौकशी होणं हा मुद्दा आहे. त्या क्लिपमध्ये आवाज कुणाचा आहे हे शोधणं यंत्रणेचं काम आहे. या प्रकरणावरून कोणतंही राजकारण होता कामा नये, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
…त्यामुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा; पंकजा मुंडेंचं मोठं विधान
“अवघ्या 3 वर्षांत भाजपला रामराम ठोकत ‘या’ नेत्यानं केला काँग्रेसमध्ये गृहप्रवेश”
“वरळीत आदित्य ठाकरेंचंच चालतं, त्यांनी सांगितल्यामुळंच पब-बार बिनधास्त सुरु”
कोरोनामुळे दहावी, बारावीच्या परीक्षा होणार नाहीत?- शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड