Home महाराष्ट्र “संजय राठोडांचा राजीनामा घेतला म्हणजे काय महाराष्ट्रावर उपकार केले नाही”

“संजय राठोडांचा राजीनामा घेतला म्हणजे काय महाराष्ट्रावर उपकार केले नाही”

मुंबई :  पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात सध्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे. राठोडांनी राजीनामा दिल्यानंतर भाजप नेते नितेश राणे यांनी यावर प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

एक लक्षात घ्या, ज्या प्रकारे मुख्यमंत्री पत्रकार परिषदेमध्ये वागले आणि एकंदरीत 15 दिवसानंतर राजीनामा घेऊन त्यांनी महाराष्ट्रावर काही उपकार केलेला नाही. ते ज्या पद्धतीने वागत होते म्हणजे ते फार मोठे उपकार महाराष्ट्रावर केलेला आहे की आम्ही राजीनामा घेतोय आणि मग त्यांच्या आईवडिलांचं असं ऐका, हे माझं असं ऐका. 15 दिवसांमध्ये जे तुम्ही पहिल्याच दिवशी करायला हवं होता, ती कारवाई सुरू करायला पाहिजे होती, त्या बिचाऱ्या आइ-वडिलांच्या घरातील अॅक्टिव्ह मुलगी गेली आहे, त्यांची कर्ताधर्ता गेलेली आहे. आणि तुम्ही 15 दिवसांनंतर असं वागून दाखवतंय की जसं काय तुम्ही फार मोठं उपकार केलेलं आहे. हा राजीनामा पहिलाच घेतला पाहिजे होता, आत्तापर्यंत चाैकशीमध्ये काय झालं हे आत्ता पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं पाहिजे होतं. अजूनपर्यंत एफआयआर का घेतली नाही, त्याच्यामध्ये जे वनखात्याचे 2 अधिकारी होते त्यांचं काय झालं. अरूण राठोड अजून गायब आहे त्याचं काय झालं? असे अनेक प्रश्न नितेश राणेंनी सरकारला केले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

“कुणालाही पाठीशी घालणार नाही, दोषीला कठोर शिक्षा देऊ”

“विरोधी पक्षांनी अतिशय घाणेरडं राजकारण केलंय, या प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी”

“जे धाडस उद्धव ठाकरेंनी दाखवलं, तेच शरद पवारांनी दाखवावं; धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा”

आता संजय राठोड यांना अटक करा; राजीनाम्या नंतर अतुल भातखळकरांची मागणी