शिवसेनेला ढोंगीपणाचा आजार जडलाय, गेट वेल सून- अमृता फडणवीस

0
211

मुंबई : औरंगाबाद येथे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी झाडं कापण्यात येणार आहेत, अशा आशयाची बातमी एका वृत्तपत्रात छापून आली आहे. यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

“शिवसेनेला ढोंगीपणाचा आजार जडलाय. गेट वेल सून, शिवसेना आपल्या सोयीप्रमाणे  झाडांच्या कत्तलीसाठी विरोध करतात,” असं ट्वीट करत अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

अमृता फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी झाडं कापण्यात येणार या बातमीचा फोटो ट्वीट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे कारशेड प्रकल्पाला स्थगिती देत आरे जंगल तोडीला विरोध करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा आदेश दिला. आरे जंगल तोड प्रकरणावरुन भाजपवर निशाणा साधला होता.

महत्वाच्या घडामोडी –

दिल्लीत अनाज मंडी येथे भीषण आग; 43 जणांचा मृत्यू

बलात्काऱ्यांचे एन्काऊंटर हे यंत्रणेचे अपयश- सुप्रिया सुळे

शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलण्याची मुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे मागणी

हिंदू समाज जागृत झाला तर गाईंची कत्तल थांबेल- मोहन भागवत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here