मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही असं भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी स्पष्ट केलं. ते एबीपी माझाशी बोलत होते.
पूजा चव्हाण हिने पुण्यात केलेल्या कथित आत्महत्येप्रकरणात राठोड यांचं नाव घेतलं जात असल्याने त्यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कारवाई करावी अशी मागणी भाजपकडून केली जात आहे.
एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणामध्ये नाव समोर घेतलं जाणाऱ्या मंत्र्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करुन एफआयआर दाखल करण्याची गरज होती. मात्र राज्य सरकार आणि मुख्यमंत्री कसली वाट पाहतंय?, असा प्रश्न उपस्थित भातखळकरांनी यावेळी उपस्थित केला.
दरम्यान, बलात्कारी आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्यांची पाठराखण करणारं हे सरकार असल्याचा टोलाही भातखळकरांनी यावेळी लगावला.
महत्वाच्या घडामोडी –
खेळपट्टी नव्हे तर सुमार फलंदाजीमुळे सामना 2 दिवसात संपला- विराट कोहली
“ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण”
संजय राठोड प्रकरणी तुमच्या प्रतिमेला साजेशी वाघासारखी भूमिका घ्या- आशिष शेलार
“दोन मिनिटाच्या भेटीत मुख्यमंत्र्यांनी बहुदा कानात सांगितलं असावं, मी तुला उद्ध्वस्त होऊ देणार नाही”