“ठाकरेंच्या ताकदीत वाढ; ‘या’ मोठ्या नेत्याची पुन्हा घरवापसी”

0
219

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी जोरदार कंबर कसली असून ठाकरे गटात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता ठाकरेंची ताकद आणखी वाढली आहे.

ही बातमी पण वाचा : उद्धव ठाकरे, यांच्यासोबत जे केलं, तेच एकनाथ शिंदे यांच्यासोबत…; अजित पवारांचं मोठं विधान

शिर्डी लोकसभेचे माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी आज त्यांच्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्री निवासस्थानी, पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

दरम्यान, या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरेंनी, भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. काही पापी लोक शिवसेना संपवायला निघाले आहेत. शिवसैनिक त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला. भाऊसाहेब यांनी शिवसेना सोडली. पण कधी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला नाही. हे पापी, गद्दार शिवसेना संपवायला निघालेत. त्याचा शिवसैनिक बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी –

मोठी बातमी! खासदार नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी

“बच्चू कडूंनी भर सभेत सांगितलं, गुपीत, म्हणाले, फडणवीसांच्या सांगण्यावरून…”

“शरद पवारांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आलं नाही; अजित पवार गटातील ‘या’ नेत्याची टीका”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here