भोपाळ : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे एका तरुणीवर चालत्या कारमध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पीडित तरुणी कुलैथ येथे राहणारी असून तिला नोकरीची ऑफर देऊन गाडीत बसवून नेण्यात आलं होतं. आणि याचदरम्यान चालत्या कारमध्येच तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप तिनं केला आहे.
आरोपी व्यक्तीचं नाव रामबाबू गुर्जर असून तो मुरैना येथे राहणारा आहे. त्याने तरुणीला नोकरीची संधी देण्याचा बहाणा सांगून बहोडापूर येथे गाडीत बसवलं. आणि चालत्या गाडीतच तिच्यावर बलात्कार केला. धक्कादायक बाब म्हणजे आपल्यावर बलात्कार होत असताना आरोपीचा कार चालक गाडी चालवत होता. त्याने या प्रकारात आरोपीला साथ दिल्याचा आरोप पीडित महिलेनं केला आहे.
दरम्यान, आरोपीच्या तावडीतून आपली कशीबशी सुटका करुन महिलेने इंदरगंज पोलिस ठाणे गाठलं. आणि तक्रार नोंद केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी रामबाबू आणि कारचालकाला अटक केली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“सांगली महापाैर निवडणुकीच्या दिवशीही भाजपचे 7 नगरसेवक नाॅट रिचेबल; सत्ताधाऱ्यांचे टेंशन कायम”
“कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी धनंजय महाडिक यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल”
“वनमंत्री संजय राठोड यवतमाळ येथील निवासस्थानी दाखल; थोड्याच वेळात पोहरादेवीला रवाना होणार”
…म्हणून तुम्ही लोकांना लॉकडाऊनची धमकी देणार का?; मनसेचा ठाकरे सरकारला सवाल