“राज ठाकरेंवरील टीकेनंतर, आता मनसे नेत्याच्या जितेंद्र आव्हाडांना इशारा, म्हणाले, मनसैनिकांचा संयम सुटला तर तुमचं…”

0
493

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मनसे नेते अमेय खोपकर आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातील शाब्दिक वार संपतच नाहीयेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 14 जून रोजी राज ठाकरे यांना शुभेच्छा देणारे बॅनर मनसैनिकांनी लावले होते. या बॅनरवर, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातले मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला होता. त्यावरून जितेंद्र आव्हाडांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती.

सध्या त्यांच्या पक्षाचा एकच आमदार आहे. हा आकडा 50 पर्यंत न्यावा लागेल. फक्त कुणाचीतरी नक्कल करून मुख्यमंत्री होता येत नाही, असा टोला आव्हाडांनी लगावला होता. यावरून अमेय खोपकर यांनी आव्हाडांना प्रत्युत्तर दिलं.

ही बातमी पण वाचा : उद्धव ठाकरेंना भाजपसोबत यायचं असेल तर…; भाजपच्या मोठ्या नेत्याची खुली ऑफर

‘जितुद्दीन आव्हाड यांचा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे. हे कोण बोललं होतं ते सगळ्यांनाच आठवत असेल. आता नागच तो, फणा काढूनच फिरणार. पण कितीही फुत्कार निघाले, तरी आम्ही मनसैनिक बिनकामाच्या नागाला अजिबातच महत्त्व देत नाही, असं ट्विट करत अमेय खोपकरांनी आव्हाडांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. यानंतर आव्हाडांनी पुन्हा अमेय खोपकरांनी प्रत्युत्तर दिलं.

‘माझा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे हे कोण बोलले होते ते सगळ्यांना आठवत असेलच. पण त्याला मी दिलेले उत्तरही लोकांना आठवते आणि लोक गदगदून हसतात. माझा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे, मग तुमचा चेहरा कोंबडीच्या कोणत्या भागासारखा आहे सांगू का? बघा आरश्यात. जशास तसे उत्तर कुणालाही देता येतं. अमेय खोपकर, लवकर बरा हो’, असा सल्ला आव्हाडांनी अमेय खोपकरांना दिला. यावरून पुन्हा अमेक खोपकरांनी, आव्हाडांना प्रत्युत्तर दिलं आहे.

कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण असताना तुम्हाला मनसैनिकांच्या खोड्या करायची गरज काय आहे. वातावरण बिघडवण्याची काय गरज आहे? कोण काय करतंय, कोण कोणावर काय टीका करतंय? याच्याशी तुमचं काय देणंघेणं? जितेंद्र आव्हाडांची राज ठाकरेंविषयी बोलण्याची पात्रता नाही. उद्या जर आमचा संयम सुटला तर तुमचं इकडे तिकडे पळणे मुश्किल होईल. महाराष्ट्र सैनिक तुमच्या लोकांचे फिरणे मुश्किल करून टाकेल. महाराष्ट्र सैनिक शांत आहे तोवर शांत आहे. उगाच आमची माथी भडकवू नका. आम्हाला चिथवू नका. आव्हाडांनी हा थिल्लरपणा बंद करावा, हा थिल्लर नाच बंद करा, अन्यथा महाराष्ट्र सैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, ही चेतावणी समजा, असा इशारा खोपकरांनी, यावेळी आव्हाडांना दिला.

महत्त्वाच्या घडामोडी –

BCCI अध्यक्षाच्या मुलामुळे, माझं करिअर बर्बाद झालं; टीम इंडियाच्या ‘या’ स्टार खेळाडूचा गंभीर आरोप

भाजप-शिंदे गटात वादाची ठिणगी; ‘या’ भाजप नेत्याची मुख्यंत्र्यांवर टीका

भाजप मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आम्ही…; नाना पटोलेंचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here